You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फोटो फिचर: म्हातारीच्या बुटाबाबत ही कल्पना या चित्रकाराच्या डोक्यात आली अन् पुढे काय घडलं?
- Author, शार्दुल कदम
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 2 मिनिटे
ग्राफिक आर्टिस्ट ओंकार पाटीलने मुंबईच्या कमला नेहरू पार्कमधील म्हातारीच्या बुटावर एक चित्र काढलं.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना 'तुम्ही हा म्हातारीचा बूट तर बघितलाच असेल पण म्हातारी बघितली आहे का? ' असं विचारत ते पोस्ट केलं. त्याच्या या चित्राला सोशल मीडियावर अनेकांची पसंती मिळाली.
ओंकारने जे. जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. ओमकारने पहिल्यांदा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई पाहिली. चित्रकार असल्याने त्याला शहरातल्या वास्तूंबद्दल अनेक कल्पना सुचत गेल्या, त्या त्याने चित्रात उतरवल्या.
"म्हातारी चितारायची होती, मग ती मुंबईशी संबधित हवी. अर्थात ती मराठी असेल. भव्य असेल तर तिच्याभोवतीचं गूढही कायम राहायला पाहिजे. मग मला तिचं चित्र काढताना चष्मा, दागिने सगळं युनिक काढावसं वाटलं," तो सांगतो.
ओंकार शिक्षणाच्या निमित्ताने 2017 साली मुंबईत आला. मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळं आणि वास्तूंवरील चित्रांची ही सीरिज करताना मुंबई वेगवेगळ्या वेळी निराळी दिसते असं त्याच्या लक्षात आलं.
त्याने सायकलवरुन मुंबईची सफर करायला सुरुवात केली. नंतर त्याला अशा अनेक कल्पना सुचू लागल्या. ओंकारच्या अशाच काही आर्टवर्कची ही झलक...
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)