एशियन गेम्स फायनल: भारताचे पाकिस्तानला 212धावांचे आवाहन; तिलक, अभिषेककडून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई

एशियन गेम्स फायनल: अभिषेककडून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई, इतर फलंदाजांचा मात्र संघर्ष
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत क्रिकेटमधील सुवर्णपदकासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे.

भारतानं सुवर्णपदकासाठीच्या या सामन्यात पाकिस्तानसमोर 212 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली होती.

त्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. सलामीवीर अभिषेक शर्माने [28] चेंडूत [61] धावांची खेळी करत अर्धशतक झळकावलं. त्याने 03 चौकार आणि 07 षटकारांची आतषबाजी केली.

अभिषेकच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 10 ओव्हरमध्ये 114 धावा केल्या होत्या, पण दुसरीकडे भारतानं त्यानंतर एकापाठोपाठ विकेट गमावल्याचंही पाहायला मिळालं.

अखेरच्या ओव्हरमध्ये शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी मात्र फटकेबाजी केली.

भारतानं सेमिफायनल सामन्यात श्रीलंकेचा 124 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर पाकिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत फायनल गाठली होती.

भारताची इनिंग

भारतानं डावाची सुरुवात करताना पहिल्या ओव्हरमध्ये संयम दाखवला. अभिषेक आणि वैभव सूर्यवंशी दोघांनीही पहिल्या ओव्हरमध्ये शांत राहण्याचा पवित्रा घेतला.

पण पुढच्याच ओव्हरमध्ये वैभवनं पुढाकार घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यानं दोन षटकार खेचले आणि पाठोपाठ अभिषेकनेही फटकेबाजी करत दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा लुटल्या.

त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्येही 15 धावा घेतल्या पण वैभव या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीप करताना चुकला आणि सायम अयूबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यानंतर मात्र अभिषेकनं एकच फटकेबाजी सुरू ठेवली. पाकिस्तानच्या सर्वच गोलंदाजांची त्यानं धुलाई केली. पण दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनही स्वस्तात बाद झाला. पण विकेटचा अभिषेकला फरक पडत नसल्याचं दिसलं.

सायम अयूब
फोटो कॅप्शन, सायम अयूब

त्यानं फटकेबाजी करत 20 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अहमद दनियालच्या एका चेंडूवर मात्र तो बाद झाला. त्यानं 28 चेंडूमध्ये 61 धावा केल्या.

त्यानंतर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. पण इशान किशन 18 चेंडूंमध्ये 20 धावा करून बाद झाला. मिन्हासनं त्याचा त्रिफळा उडवला. तर अबरारनं कर्णधार श्रेयस अय्यरला बाद केलं.

त्यानंतर तिलक वर्मानं शेवटच्या ओव्हर्मध्ये फटेबाजी करत भारताना धावांपर्यंत पोहोचवलं. तिलक वर्मानं 22 बॉलमध्ये 51 धावा केल्या. तर शिवम दुबेनं 15 चेंडून 27 धावा करत शेवटी धावांचा वेग वाढवला.

पाकिस्तानच्या दनियाल आणि मिन्हासनं प्रत्येकी दोन तर अयूब, अबरार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

असे आहेत संघ

भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि जसप्रित बुमराह

पाकिस्तान : साहीबजादा फरहान (कर्णधार), माज सदाकत, उस्मान ख़ान (विकेटकीपर), सायम अयूब, हसन नवाज, अब्दुल समद, अराफात मिन्हास, अहमद दानियाल, मोहम्मद वसीम, सुफयान मुकिम आणि अबरार अहमद.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)