'शेवटच्या क्षणापर्यंत आईने बाळाला छातीशी घट्ट कवटाळलं', जबलपूर बोट अपघातातील मन सुन्न करणारी घटना

'शेवटच्या क्षणापर्यंत आईने बाळाला छातीशी घट्ट कवटाळलं', जबलपूर बोट अपघातातील मन सुन्न करणारी घटना

मध्य प्रदेशातील बर्गी धरणावर घडलेल्या क्रूझ दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक दृश्य समोर आलं आहे.

बुडालेल्या बोटीच्या अवशेषांमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला, ती आपल्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून बसलेली होती. शेवटच्या क्षणापर्यंत तिने आपल्या बाळाला सोडलं नाही.

आग्रा येथून आलेल्या निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बोटीच्या आतली परिस्थिती अत्यंत अवघड होती.

अरुंद जागा, मलबा आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे मार्ग काढण्यासाठी त्यांना हातोड्यांचा वापर करावा लागला. या प्रक्रियेदरम्यान एक कर्मचारी स्वतः अडकण्यापासून थोडक्यात बचावला.

अधिकाऱ्यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी अचानक आलेल्या वादळामुळे जबलपूर जिल्ह्यात ही क्रूझ बोट उलटून बुडाली.

या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जणांना सुखरूप वाचवण्यात आले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)