पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल 2026 : प्राथमिक कल येण्यास सुरुवात; कोणत्या राज्यात कोण पुढे कोण मागे?

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल येण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान झालं.
या निवडणुकीत चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. आज (4 मे) या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.
पश्चिम बंगालमधील मतमोजणीसाठी केलेल्या व्यवस्थेबाबत, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल म्हणाले, "293 जागांची मतमोजणी सोमवारी (4 मे) होणार आहे. 35 जिल्हा मुख्यालय आणि 42 उपविभागीय मुख्यालयांसह एकूण 77 ठिकाणी मतमोजणी होईल."

फोटो स्रोत, Getty Images
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बहुतेक केंद्रे जिल्हा स्तरावर असावीत. राज्यभरात एकूण 459 मतमोजणी हॉल आहेत. मतमोजणीवर देखरेख ठेवण्यासाठी 533 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत."
पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठीचे मतदान 23 आणि 29 एप्रिल रोजी संपले, परंतु फाल्टा मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान होणार आहे.
यामुळे आज पश्चिम बंगालमधील 293 जागांचा निकाल लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























