कामाच्या ठिकाणी मनोरुग्णाला कसं ओळखायचं? मनोरुग्ण बनतोय असं वाटलं अन् कॉर्पोरेट जग सोडलं

A man holding his face and screaming at the camera, He's wearing a suit and a red and blue polka-dot tie.
फोटो कॅप्शन, गेरेंट अँडरसन यांनी सांगितलं की, लंडनमध्ये ट्रेडर म्हणून काम करत असताना यश मिळवणं हा त्यांच्यासाठी ध्यास बनला होता.
    • Author, अंग्राहद थॉमस
    • Role, बीबीसी वेल्स
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

काम करत असताना आपल्याला किंवा आपल्या सहकाऱ्यांना अनेकदा एखाद्या बरोबर काम करणं अवघड आहे असं वाटत असतं.

असे लोक संतापात विचार न करता वर्तन करू शकतात, इतरांशी कपटीपणानं वागू शकतात किंवा अगदी करिअरमध्ये प्रगतीसाठी थेट खोटंही बोलू शकतात. पण एखादा न आवडणारा सहकारी आणि मनोरुग्णाची लक्षणं असणारा व्यक्ती यात फरक कसा ओळखायचा.

लंडनमधील पूर्वाश्रमीचे बँकर आणि लेखक गेरेंट अँडरसन यांना एका मानसशास्त्रज्ञानं तपासणी केली तेव्हा सांगितलं होतं की, तीव्र स्पर्धा असलेल्या व्यावसायिक जगात यश मिळवण्यासाठी त्यांच्यात 'परिस्थितीजन्य मनोविकृती' (situational psychopathy) असू शकते.

"अशा वातावरणात यशस्वी होण्यासाठी मला खरंच आणखी वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती बनावं लागलं," असं ते म्हणाले.

अँडरसन 53 वर्षांचे असून सध्या ते मॉनमाउथशायरमध्ये राहतात. सध्याच्या काळातली कामाची काही ठिकाणं आणि सामाजिक प्रभावामुळं मनोविकृती असलेल्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळतं, असं ते सांगतात.

त्यांनी लंडनमध्ये 12 वर्षं विश्लेषक म्हणून काम केलं आणि लाखो पौंड कमावले. 2008 च्या आर्थिक संकटात त्यांनी नोकरी सोडली.

A young man with mid length blond hair, smiling at the camera. He's wearing a big cowboy style hat, a black long-sleeved top and clear glasses.
फोटो कॅप्शन, अँडरसन यांचा कॉर्पोरेट क्षेत्रात केवळ काही वर्षे काम करण्याचा विचार होता. पण त्यांनी या क्षेत्रात पदोन्नती मिळवत वरच्या स्तरापर्यंत मजल मारली.

शहरांमध्ये काम करताना 'डार्क ट्रायड' प्रकारच्या वर्तनाला प्रोत्साहन मिळतं असंही ते म्हणाले. ('डार्क ट्रायड'ही मानसशास्त्रातील एक कल्पना असून स्वतःला श्रेष्ठ समजणं हा त्याच्या काही अर्थांपैकी एक अर्थ आहे.)

प्रचंड आत्मविश्वास असणं, इतरांवर नियंत्रण ठेवणं, निर्णयांमध्ये भावनिकदृष्ट्या न गुंतणं अशी काही वैशिष्ट्ये त्यांनी या वर्तनाबाबत सांगितली.

"मी शहराच्या या वातावरणाशी जुळवून घेतलं आणि माझ्यातील ही वाईट बाजू मी समोर आणू लागलो."

मनोरुग्ण ओळखता येतात का?

मनोरुग्ण ही एखादी वैद्यकीय संकल्पना नाही. तर अँटिसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Antisocial Personality Disorder) असलेली व्यक्ती म्हणजे मनोरुग्ण.

या विकाराने ग्रस्त असलेली व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करते, वर्तन करते आणि इतरही काही गोष्टी करते. त्या खालीलप्रमाणे...

  • इतरांचे शोषण करणे किंवा त्यांचा फायदा उचलणे
  • केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप किंवा खंत नसणे
  • बेजबाबदारपणे वर्तन
  • दीर्घकाळ टिकणारी नाती जपण्यात अडचण असणे
  • रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत
  • स्वतःमध्ये अपराधीपणाची भावना नसते आणि स्वतःच्या आयुष्यातील समस्यांसाठी इतरांना दोष देणे
A man in a black suit and top hat. He has a pink shirt and stripy blue tie. He also has a short beard and is surrounded by office buildings.
फोटो कॅप्शन, अँडरसन हे निनावी स्तंभलेखक बनले आणि त्यांनी कॉर्पोरेट जग पूर्णपणे सोडलं.

अँडरसन हे वयाच्या विशीमध्ये भारताच्या गोव्यामध्ये पर्यटकांना लहान सहान वस्तू विकून जीवनाचा आनंद घेत होते.

त्यांच्या भावानं त्यांना फायनान्स क्षेत्रात एका नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितलं. ते काही वर्षच ती नोकरी करणार होते.

नोकरीसाठीच्या मुलाखतीच्या एक दिवस आधी केस कापले, शेव्ह केलं, 60 पौंड किमतीचा सूट विकत घेतला, असं ते सांगतात.

पण इंटर्न म्हणून कामाची संधी मिळाली आणि ते कामच त्यांच्यासाठी सर्वस्व बनलं. त्यात कामासाठी मिळणारा जो बोनस होता त्यातून आपण किती यश मिळवलं याची आखणी ते करू लागले.

पैशाच्या आकड्यामुळं इतरांशी तुलना करता आली आणि त्यामुळं स्पर्धा करण्याच्या वृत्तीला चालना मिळाली, असं अँडरसन म्हणतात.

कॉर्पोरेट क्षेत्रात मिळते प्रोत्साहन

पण यशाची शिखरं चढताना मदत करणारे त्यांच्यातील काही गुण मानसिक आजाराशी संबंधित होते, असं त्यांना वाटतं.

"माझ्यात एक प्रकारचा निर्भिडपणा, बोलघेवडेपणा होता. ट्रेडिंग फ्लोअरवर घडणाऱ्या गोष्टींचा माझ्यावर भावनिकदृष्ट्या फारसा परिणाम होत नसे."

अँडरसन यांच्या मते, मनोरुग्णांमध्ये आढळणाऱ्या अनेक वैशिष्ट्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात प्रोत्साहन मिळतं आणि मोठ्या पदांवर ती अधिक फायद्याची ठरतात.

मनोरुग्णांबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, "तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत नाही, त्यांच्याशी लग्न करत नाही आणि त्यांना मतदानही करत नाही," असं त्यांनी सांगितलं.

कार्डिफ विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट स्नोडेन यांनी सुमारे 25 वर्षे मानसोपचाराचा अभ्यास केला आहे आणि सायकोपॅथी चेकलिस्टचे (PCL-R) निर्माते रॉबर्ट हेअर यांच्यासोबत कामही केलं आहे.

या चेकलिस्टमध्ये 20 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 0 ते 2 गुण आहेत आणि कमाल गुण 40 आहेत.

A bald man looking directly at the camera, wearing a black t-shirt and glasses. He has a shelf full of books behind him.
फोटो कॅप्शन, रॉबर्ट स्नोडेन यांच्या मते, मानसिक विकृतीचं सर्वात मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे इतरांबद्दल सहानुभूती नसणं.

स्नोडेन यांच्या मते त्यांनी अभ्यासलेल्यांमध्ये बहुतेक लोकांचे गुण 5 पेक्षा कमी होते. 25 किंवा त्याहून अधिक गुण हे साधारणपणे मानसिक आजाराच्या लक्षणांचे संकेत देतात.

अँडरसन यांनी स्वतःला सुमारे 8 किंवा 9 गुण दिले.

"मानसिक विकृती ही अशी स्थिती आहे जिथं मी स्वतःलाही पाहतो आणि इतरांनाही,"असं स्नोडेन सांगतात.

"असे लोक खूप मजबूत असू शकतात आणि चांगले नेते बनू शकतात. पण त्यांच्या नेतृत्वात अनेक त्रुटी असतात. त्यांचं सर्वकाही फक्त स्वतःबद्दलच असतं, इतरांबद्दल नाही," असंही त्यांनी सांगितलं.

मानसिक विकृतीचं सर्वात मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे इतरांबद्दल सहानुभूती नसणं.

बहुतांश मनोरुग्ण कधीही कोणाला जीवे मारत नाहीत. पण ते इतरांचा गैरफायदा घेऊ शकतात, त्यांचं शोषण करू शकतात आणि त्यांना इतरांची काहीही पर्वा नसते.

स्नोडेन यांच्या मते, "मनोविकृत प्रवृत्ती असलेले काही लोक कॉर्पोरेट वातावरणाकडं आकर्षित होऊ शकतात. अशा ठिकाणी 'अगदी असंवेदनशील' राहून फक्त पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करत काम करायचं असतं."

यशस्वी होण्यासाठी वर्तनात बदल?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मानसिक विकृतीवर कोणताही उपचार उपलब्ध नाही, कारण ती असलेल्या व्यक्तींना त्यांच्यामध्ये काहीही दोष नाही, असंच वाटत असतं.

न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ केरी डेनेस यांनी नुकतंच अँडरसनचं मूल्यांकन केलं आणि ते मनोरुग्ण नाही, असा निष्कर्ष काढला.

डेनेस यांच्या मते, ते कदाचित 'परिस्थितीजन्य मनोरुग्ण' बनले असतील. म्हणजे त्यांनी महत्त्वाकांक्षेला प्रोत्साहन देणाऱ्या वातावरणात यशस्वी होण्यासाठी आपल्या वर्तनात बदल केला असेल.

"मानसिक विकृतीच्या संस्कृतीतही यशस्वी होण्यासाठी किमान काही काळासाठी तरी तुम्हाला विकृत मनोवृत्तीची गरज नसते," असं त्या म्हणाल्या

अँडरसन यांना मिळालेल्या वातावरणात यश मिळवण्यासाठी त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील काही वाईट वैशिष्ट्ये एका ठरावीक पातळीपर्यंत वाढवता आली. अनेकांना ते शक्य होत नाही, असंही डेनेस म्हणाल्या.

लंडनमधील आर्थिक क्षेत्रात वेगानं प्रगती करूनही, या क्षेत्रातील आमिषं, प्रचंड जोखीम आणि नियम न पाळले जाणं यामुळं भ्रमनिरास झाल्याचं अँडरसन म्हणाले.

"मी आजूबाजूला पाहिलं आणि चुकीच्या ठिकाणी आहोत असा विचार केला. एका समस्येचा भाग बनल्याचं माझ्या लक्षात आलं."

A woman with big ginger hair looking at the camera. She has a full face of makeup on and wearing a pale blue suit jacket.
फोटो कॅप्शन, न्यायवैद्यक मानसोपचारतज्ज्ञ केरी डेनेस यांच्यामते मानसिक विकृतीच्या संस्कृतीतही यशस्वी होण्यासाठी किमान काही काळासाठी तरी तुम्हाला विकृत मनोवृत्तीची गरज नसते.

त्यांनी सर्वकाही सोडलं आणि दर शुक्रवारी 'लंडन पेपर'साठी 'सिटी बॉय' नावानं निनावी स्तंभलेखन करू लागले. त्यात त्यांनी अतिरेकी मद्यपान, भोजन, अमली पदार्थ आणि अनैतिक लैंगिक संबंधांच्या जगाबाबत अनेक बाबी मांडल्या.

त्याचंच पुढं 'सिटीबॉय' नावाचं पुस्तक आलं. त्याच्या 4 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. 6 भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं.

नुकतंच त्यांचं 5वं पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्यात त्यांनी मानसिक विकृतीची लक्षणं आत्मसात केल्यानं कॉर्पोरेट क्षेत्रात प्रगती करण्यास कशी मदत होऊ शकते, याचा अभ्यास केला आहे.

अँडरसन सांगतात की, कॉर्पोरेट क्षेत्रात असताना ते कमी मनमिळाऊ होते. पण आता ते अधिक प्रेमळ व्यक्ती बनले असावे अशी त्यांना आशा आहे.

"आता मी प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करू शकतो आणि इतरांशी हेराफेरी न करता किंवा निर्दयीपणे न वागता राहू शकतो."

पण माझ्यामध्ये मानसिक विकृतीची काहीही लक्षणं शिल्लक नाहीत, यावर कदाचित माझ्या पत्नीचं मत वेगळं असेल असं ते गमतीनं म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)