उल्हासनगरात महिलेची धिंड, 6 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

व्हीडिओ कॅप्शन, उल्हासनगरात महिलेची धिंड, सहा जणांवर गुन्हा दाखल
उल्हासनगरात महिलेची धिंड, 6 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Published

उल्हासनगरमध्ये एका 50 वर्षीय महिलेसह तिची बहिण आणि मुलीला काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचे केस कापून धिंड काढल्याचा प्रकार घडलाय. यात या तिघीही जखमी झाल्या आहेत.

विठ्ठलवाडी इथल्या तरुण मित्र मंडळ गल्लीत 14 मे रोजी सकाळी ही घटना घडली. हा प्रकार घडला तिथे समोरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची शाखा आहे. तिथे पोलीस आणि लोक असूनही कुणी मदत केली नाही, असा आरोप केला जातोय.

या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेनं आरोपींविरोधात वर्षभरापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ती तक्रार आणि जुन्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरत आरोपींनी मारहाण केली. असा आरोप आहे.

जातीविषयीच्या वादातून हा प्रकार घडला आहे का, याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)