कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी नाशिकमध्ये गोदावरी नदीत पाणी सोडणार?

व्हीडिओ कॅप्शन, Verticle कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी नाशिकमध्ये गोदावरी नदीत पाणी सोडणार?
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी नाशिकमध्ये गोदावरी नदीत पाणी सोडणार?
Published

कुंभमेळ्याच्या कामामुळे गोदावरीचे पाणी आडवण्यात आलंय आणि रामकुंडाचा संपूर्ण परिसर कोरडा पडलाय.

पण ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी या गोदावरी नदीचं पाणी प्रवाहित राहावं आणि याच्या सौंदर्यात वाढ व्हावी अशी मागणी इथल्या पुरोहित संघाने आणि त्याचबरोबर साधू महंतांनी सुद्धा केलेली आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत याच ठिकाणी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

ध्वजारोहणाच्या सोहळ्याला गोदावरी नदी प्रवाही हवी असेल तर कदाचित गंगापूर धरणातून असणारं पाणी सोडण्याचा विचार देखील सुरू आहे.

पण दुसऱ्या बाजूला नाशिकच्या पंधरा पैकी तेरा तालुक्यांमध्ये मोठा दुष्काळ आहे आणि राज्याचा विचार केला तर राज्यातल्या तीनशे चार तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय.

त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर दुष्काळ असताना नदीमध्ये पाणी कसं सोडायचं हा पेच निर्माण झालेला दिसतोय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन