मेट गाला 2026 मध्ये आकर्षक पेहरावासह सेलिब्रिटींचा सहभाग, 'या' भारतीयांनीही वेधलं लक्ष

बियॉन्से - अमेरिकेची सुप्रसिद्ध गायिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बियॉन्से - अमेरिकेची सुप्रसिद्ध गायिका
वाचन वेळ: 3 मिनिटे

फॅशन जगतातील 'सर्वात मोठी रात्र' असा नावलौकिक असलेल्या 'मेट गाला'चा इव्हेंट नुकताच पार पडला. मेट गालाच्या इव्हेंटमध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभाग घेतात.

नाविन्यपूर्ण वेशभूषा करा, विविध प्रयोग करा असे आवाहन आयोजकांनी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींना केले होते.

त्यानुसार सेलिब्रिटींनी हटके अंदाजात या कार्यक्रमात सहभाग घेतला. मेट गालाचा फॅशन शो हा एक चॅरिटी इव्हेंट असतो. यातून जो निधी उभा केला जातो तो मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इंस्टिट्यूटला दिला जातो.

या सोहळ्यात नेमकं कोण कोण आलं आणि त्यांच्या वेशभूषेनी कसं सर्वांना आकर्षित करून घेतलं ते आपण या फोटो गॅलरीतून पाहू.

बियॉन्सेच्या रत्नजडित आणि फरच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बियॉन्सेच्या रत्नजडित आणि फरच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

बियॉन्से ही अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका आहे. फ्रेंच डिजायनर ओलिव्हिएर राउस्टिंगने बनवलेल्या गाऊनमध्ये तिने मेट गालात सहभाग घेतला.

बियॉन्से

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बियॉन्सेचा पती जे झी हा देखील प्रसिद्ध गायक आहे. तसेच त्यांची मुलगी ब्लू एव्ही कार्टर ही देखील गायिका आहे.

बियॉन्सेनी पती आणि मुलीसह मेट गालात सहभाग घेतला. बियॉन्सेचा पती जे झी हा प्रसिद्ध गायक-रॅपर आहे. तर त्यांची मुलगी ब्लू एव्ही कार्टर ही देखील गायिका आहे.

सुपर मॉडल हिदी क्लमच्या पोशाखामुळे सर्वच जण आश्चर्य चकित झाले. हिदी क्लमने संगमरवरी मूर्तीसारखा पोशाख परिधान केला होता. तिचा हा पोशाख इव्हेंट आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

हिदी क्लम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिदी क्लम

या सोहळ्यात भारतीयांनी देखील सहभाग नोंदवला. प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा देखील या सोहळ्यात दिसला.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा

मनिष मल्होत्राने आपल्या पोशाखातून मुंबई शहराला अभिवादन केले. त्याचा हा पोशाख बनवण्यासाठी 50 जणांची टीम काम करत होती आणि हा पोशाख बनवण्यासाठी एकूण 960 तास लागले.

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करन जोहरने देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला.

करन जोहर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, करन जोहर

मनिष मल्होत्रानो डिझाइन केलेल्या पोशाखात करन जोहर दिसला. या पोशाखेच वैशिष्ट्य म्हणजे या पोशाखावर भारतीय पौराणिक कथांमधील चित्रं होती आणि ती हाताने काढलेली होती.

भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

इशा अंबानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इशा अंबानी

हैदराबादस्थित उद्योजिका सुधा रेड्डींनी देखील देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

सुधा रेड्डी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुधा रेड्डी - भारतीय उद्योजिका
सुधा रेड्डी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुधा रेड्डी

भारतीय उद्योजिका अनन्या बिरला यांनी देखील मेटगालात सहभाग नोंदवला.

अनन्या बिरला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनन्या बिरला

अनन्या बिरला यांनी घातलेल्या मास्कची चर्चा होती.

अनन्या बिरला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनन्या बिरला

नाट्यसृष्टीतील एक मोठे नाव जॉर्डन रॉथ यांच्या या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जॉर्डन रॉथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॉर्डन रॉथ - नाट्य निर्मात्या

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)