दीनानाथ दलाल : घराघरात चित्रकला पोहोचवणाऱ्या या चित्रकाराची ही चित्रं तुम्ही पाहिलीत का?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

दीनानाथ दलाल. मराठी कलाविश्वात मनसोक्त मुशाफिरी केलेल्या चित्रकाराचा आज जन्मदिवस. 30 मे 1916 रोजी त्यांचा गोव्यात मडगाव येथे जन्म झाला होता. आपल्या चित्रकलेच्या तीन दशकांच्या समृद्ध कारकिर्दीत दलालांनी असंख्य वैविध्यपूर्ण, अभिजात चित्रनिर्मिती केली.

वयाच्या 20व्या वर्षी ते मुंबईत आले. केतकर मास्तरांच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी गेले, तिथं त्याचं काम पाहून मास्तरांनी शिकण्यसाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येण्यास सांगितलं. शिकवत असतानाच त्यांनी बाहेरून जे. जे. कला महाविद्यालयाचा डिप्लोमा पूर्ण केला.

पुढे मौज प्रकाशनाच्या जागेत काम करण्यासाठी एक खोली मिळाली आणि त्यांच्या व्यावसायिक कामांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वेगवेगळ्या लेखकांशी संपर्क झाला. सामंतांच्या अॅड एजन्सीमध्ये त्यांनी काम केलं. 'दीपावली'तून दलालांची चित्रं घरोघरी पोहोचली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.