श्रीलंका चीनला तब्बल 1 लाख माकडं का पाठवणार आहे?

माकडं
Published

श्रीलंका सरकार चीनला तब्बल 1 लाख माकडं पाठवण्याचा विचार करत आहे. त्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचं श्रीलंकेचे कृषीमंत्री महिंदा अमरावीरा यांनी बीबीसीला सांगितलं आहे.

चीननं 1 लाख माकडं त्यांच्या देशात पाठवण्याची विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. चीननं त्यांची मागणी करण्यासाठी चर्चेच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्याचं महिंदा यांनी म्हटलं आहे.

चीनला त्यांच्या वेगवेगळ्या 1000 प्राणी संग्राहलायत ही माकडं ठेवायची आहेत.

11 एप्रिलला श्रीलंकन कृषी मंत्रालयाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीत राष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव विभागाचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

या प्रकरणी श्रीलंका सरकारनं एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती याबाबतच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करणार आहे.

मंहिदा हा प्रस्ताव कॅबिनेटसमोरसुद्धा ठेवणार आहेत.

माकड

माकडांचा अर्थव्यवस्थेला धोका?

सध्याच्या घडीला श्रीलंकेतली माकडांची संख्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे.

कृषीमंत्री महिंदा अमरावीरा यांच्यामते श्रीलेकंत सध्याच्या घडीला 30 लाखांपेक्षा जास्त माकडं आहेत.

ही माकडं शेतीचं आणि पिकांचं मोठं नुकसान करत असल्याचा त्यांचा दावा आहे.

गेल्या एका वर्षात माकडांनी तब्बल 2 कोटी नारळांचं नुकसान केल्याची माहिती महिंदा यांनी दिली आहे.

माकडांकडून पिकांच्या होणाऱ्या नासधुसीमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

यामुळे काही माकडं चीनला पाठवण्याचा निर्णय झाल्याचं त्याचं म्हणणं आहे.

चीनमध्ये माकडांचा वापर मांसासाठी?

दरम्यान ही माकडं चीन मांसासाठी वापरण्याची भीती काही लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

पण कृषीमंत्री महिंदा यांनी तशी शक्यता फेटाळून लावली आहे.

माकडांना पकडण्यापासून ते त्यांना चीनमध्ये पोहोचवण्यापर्यंतचा सर्व खर्च चीन उचलणार आहे.

एका माकडाला पकडण्यासाठी साधारण 5000 श्रीलंकन रुपये खर्च येणार असल्याचं महिंदा सांगतात.

चीन प्रत्येक माकडामागे 30 ते 50 हजार श्रीलंकन रुपये खर्च करणार आहे. त्यात त्याला पकडणे, त्याची तपासणी करणे, त्याला पिंजऱ्यात ठेवणे आणि वाहतूक खर्चाचा समावेश आहे.

महिंदा अमरावीरा
फोटो कॅप्शन, महिंदा अमरावीरा

त्यामुळे जर का चीनला या माकडांना मांसासाठी वापरायचं असेल तर त्यांना त्यांच्या देशात नफा कमावण्यासाठी एक माकड किमान 1 लाख रुपयांना विकावं लागेल, अशा वेळी चीन या माकडांचा मांसासाठी वापर करण्याची शक्यता नसल्याचं महिंदा सांगतात.

दुसरीकडे श्रीलंकन सरकारनं शेतीची नासधूस करणाऱ्या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना मारण्याची किंवा त्यांची शिकार करण्याची परवानगी दिली आहे. त्यात माकडांचासुद्धा सामावेश आहे.

पण, आपण असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं महिंदा यांच म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)