उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात हेलिकॉप्टरमधील 5 प्रवासी आणि पायलटसह सर्व 6 जणांचा मृत्यू झाला.
जोशीमठजवळील हाथी पहाड आणि चाय गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या उंच हिमालयीन प्रदेशात हा अपघात झाला.
पायलट हिमांशू सभरवाल हे दिल्लीचे रहिवासी होते.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार इम्रान कुरेशी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील 5 प्रवासी कर्नाटकाचे होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या 9 व्या स्वतंत्र पर्वतीय ब्रिगेडचे पथक दुपारी सुमारे 3:30 वाजता घटनास्थळी पोहोचले.
अपघातात पूर्णपणे नुकसान झालेल्या हेलिकॉप्टरमधील सर्व 6 जणांच्या मृत्यूची पुष्टी पथकाने केली आहे.
हे हेलिकॉप्टर ट्रान्स भारत एव्हिएशनचे होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, हेलिकॉप्टरने दुपारी 1:12 वाजता बद्रीनाथ येथून उड्डाण केले आणि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते कोसळले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






