महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट? जाणून घ्या हवामान अंदाज

व्हीडिओ कॅप्शन, Weather 30 Oct
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट? जाणून घ्या हवामान अंदाज
Published

महाराष्ट्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने 30 ऑक्टोबरला नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, 31 ऑक्टोबरला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून 1 नोव्हेंबरला राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत पाऊस पडणार? कुठे यलो अलर्ट आहे? आणि पावसाचा जोर कधी ओसरणार? जाणून घ्या या वेदर रिपोर्टमध्ये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)