You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुम्ही सुटीवर असताना बॉस तुम्हाला काम सांगू शकतात का? जाणून घ्या तुमच्या हक्कांबद्दल
- ऑफिसची शिफ्ट संपली, पण बॉसने काम दिलं तर काय कराल?
- ‘सीनियर्स माझा लैंगिक छळ करतायत, HR ऐकत नाहीये, मी काय करू?’
- ‘मी सुटीवर असतानाही काम आलं, मी नाही म्हणू शकते का?’
हे किंवा असेच काही प्रश्न तुम्हालाही पडतात का? तुमच्या कंपनीतल्या पॉलिसीज खरंच तुम्हाला माहिती आहेत का?
जर नाही, तर आम्ही असेच काही प्रश्न, जे काल्पनिक आहेत पण वास्तविक घटनांशी मिळतेजुळते असू शकतात, ते विचारले रमा सरोदे यांना. त्या कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण आणि कर्मचारी हक्कांबद्दल काम करणाऱ्या वकील आणि प्रशिक्षक आहेत.
हे प्रश्न प्रातिनिधिक आहेत, जे आमच्या बीबीसी मधल्या सहकाऱ्यांनीच तुमच्या वतीने विचारलेत, पण शेवटपर्यंत पाहा, कारण काही उत्तरं तुम्हाला चकित करू शकतात आणि काही गोष्टी अगदी रिलेटेबल वाटू शकतात.
व्हीडिओ शूट - मुस्तान मिर्झा, धाराशिव
व्हीडिओ निर्मिती आणि एडिटिंग - गुलशनकुमार वनकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)