You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पापामिया टेकडी आणि भटाळा: 2 लाख वर्षांपूर्वीच्या वारशाचं अस्तित्व धोक्यात का आलंय?
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा आणि पापामिया टेकडी ही दोन महत्वाची प्रागैतिहासिक स्थळं लाखो वर्षांच्या मानवी इतिहासाच्या खुणा जपून आहे.
मात्र, अश्मयुगीन हत्यारं, वाकाटककालीन लेणी, प्राचीन मंदिरं आणि दुर्मीळ पुरातत्त्वीय अवशेषांनी समृद्ध असलेला हा वारसा आज अवैध खाणकाम, ब्लास्टिंग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं इतिहासप्रेमींचं म्हणणं आहे.
भटाळा प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असली, तरी पापामिया टेकडी अजूनही संरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. बीबीसीच्या या विशेष रिपोर्टमधून जाणून घ्या चंद्रपूरच्या या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याची सध्याची अवस्था आणि संवर्धनाची गरज...
रिपोर्ट - शताली शेडमाके
शूट - हेमंत एकरे
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)