You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक TCS प्रकरण : FIR ची वेळ, धर्मांतराचा मुद्दा आणि तपासावर प्रश्न; ग्राऊंड रिपोर्टमध्ये काय समोर आलं?
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणाने देशभरात चर्चा निर्माण केली आहे. 26 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आले असून, यात लैंगिक शोषण, लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप आहेत.
या प्रकरणात धर्मांतराचा मुद्दा पुढे आला, मात्र एफआयआरमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांकडून केला जातो आहे. दुसरीकडे, पोलिसांच्या मते हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून तात्काळ कारवाई करण्यात आली.
एका रात्रीत अनेक एफआयआर दाखल होणं, टीसीएसच्या अंतर्गत यंत्रणेकडे तक्रारी नोंद न झाल्याचा कंपनीचा दावा आणि या प्रकरणात निदा खान यांची भूमिका या सगळ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्ही या प्रकरणातील आरोप, प्रत्यारोप आणि समोर येणारे महत्त्वाचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
रिपोर्ट: आशय येडगे
शूट: शाहिद शेख, शरद बढे
रिपोर्टिंग सहाय्य: प्रवीण ठाकरे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)