श्रावणी राणे-मोहम्मद फैज यांचं लग्न विशेष विवाह कायद्यानुसार, तरीही वाद का?

व्हीडिओ कॅप्शन, श्रावणी राणे-मोहम्मद फैज यांचं लग्न विशेष विवाह कायद्यानुसार, तरीही वाद का?
श्रावणी राणे-मोहम्मद फैज यांचं लग्न विशेष विवाह कायद्यानुसार, तरीही वाद का?
Published

"राजकारणामुळे हे आम्हाला सतावत आहेत. आम्ही काही राजकारणात नाही, मग आम्हाला का सतावलं जात आहे? माझ्या हाताची मेहंदीही गेली नाहीय आणि मी कोर्टाच्या फेऱ्या मारतेय."

22 वर्षीय श्रावणी राणे आणि 26 वर्षीय मोहम्मद फैज यांनी ऑक्टोबर 2026 मध्ये विशेष विवाह कायद्यानुसार (स्पेशल मॅरेज अॅक्ट) लग्न केलं. परंतु श्रावणीच्या आईने मेघवाडी पोलीस स्थानकात श्रावणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याची तक्रार केली आणि त्यानंतर मोहम्मद फैज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि श्रावणीची आई निलेशा राणे यांनी काही दिवसांपूर्वी मेघवाडी पोलीस स्थानकात भेट दिली. यानंतर माध्यमांशीही संवाद साधला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)