भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून सलग 13 व्यांदा करणारा देशाला संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Screengrab/DD National

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारत आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या प्रसंगी, वार्षिक परंपरेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सकाळी साडेसात वाजता तिरंगा फडकवतील आणि देशाला संबोधित करतील.

या ऐतिहासिक स्थळावरून नरेंद्र मोदींचं हे सलग 13 वे स्वातंत्र्यदिन भाषण असेल.

भाषणापूर्वी, तिन्ही सशस्त्र दलं आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांचा समावेश असलेल्या 'गार्ड ऑफ ऑनर'कडून पंतप्रधान मोदींनी सलामी स्वीकारली. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.

ध्वजारोहण समारंभादरम्यान स्वदेशी बनावटीच्या 105 मिमी 'लाइट फील्ड गन'द्वारे 21 तोफांची सलामी दिली जाईल.

पंतप्रधानांच्या भाषणानंतर, एनसीसी कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक 'वंदे मातरम' सादर करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीत वाजवलं जाईल.

या समारंभास सुमारे 27 हजार लोक उपस्थित राहतील. यामध्ये विविध क्षेत्रांतील 5 हजार विशेष अतिथी, सामान्य नागरिक आणि देशातील तरुणांचा समावेश असेल.

भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन

फोटो स्रोत, Getty Images

स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देशाला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी 'X' वर लिहिलं आहे की, "माझ्या सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हा राष्ट्रीय सण आपल्याला देशाच्या शूर वीरांनी दाखवलेले असीम धैर्य, अथक संघर्ष आणि मातृभूमीप्रती असलेली अतुलनीय निष्ठा यांची आठवण करून देतो. चला, आपण त्यांचे आदर्श अंगीकारूया आणि विकसित भारताचा संकल्प साकार करूया."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)