ग्राऊंड रिपोर्ट : दुष्काळी यवतमाळमध्ये हजारो वर्षांपूर्वी व्हायची भातशेती, 3 हजार वर्षांपूर्वी लोक कसे राहत होते?

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : दुष्काळी यवतमाळमध्ये हजारो वर्षांपूर्वी व्हायची भातशेती, 3 हजार वर्षांपूर्वी लोक कसे राहात होते?
ग्राऊंड रिपोर्ट : दुष्काळी यवतमाळमध्ये हजारो वर्षांपूर्वी व्हायची भातशेती, 3 हजार वर्षांपूर्वी लोक कसे राहत होते?
Published

यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड गावात नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात गेल्या वर्षी 3 हजार वर्षांपूर्वीच्या लोहयुगीन वस्तीचे पुरावे सापडले.

या उत्खननात घरांचे अवशेष, लोखंडी वस्तू, मातीची भांडी आणि तांदळाचे दाणे सापडले. त्या काळी इथे भातशेती केली जात असल्याचे स्पष्ट झालं.

आज दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये सातवाहन काळापर्यंत हवामान दमट होतं. त्यामुळे इथे भात, गहू, तूर आणि मूग यांसारखी पिकं घेतली जात होती. तसंच तिथले लोक मासेमारी, शिकार आणि शेती करत असत.

या संशोधनातून यवतमाळच्या प्राचीन इतिहासावर आणि हवामान बदलांवर नवा प्रकाश पडला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)