घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या 'या' ताम्रपटांमुळे कोणतं रहस्य उलगडलं?
मुंबईच्या किनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारापुरी अथवा एलिफंटा बेटावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि डेक्कन कॉलेज यांनी जे नोव्हेंबर 2025 ते जून 2026 दरम्यान उत्खनन केलं, त्यातून नवनवीन पुरावे समोर येत आहेत.
त्यात आता प्रकाशात आलेला अजून एक पुरावा म्हणजे दोन ताम्रपट.
दोन विविध राजघराण्यांशी संबंध असलेले हे ताम्रपट म्हणजे वास्तविक दोन दानपत्रं आहेत आणि त्यांच्यावर असलेल्या उल्लेखांवरून घारापुरीच्या या द्वीपाशी कोणाकोणाचा काय आणि कसा संबंध होता याविषयी यापूर्वी न झालेले खुलासे होत आहेत.
या ताम्रपटांवर उल्लेख असलेल्या तारखांवरून हे तिसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकादरम्यान कोरण्यात आले आहेत.
बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा :घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपटांमुळे उलगडलं 'हे' रहस्य
त्यातला एक पश्चिम भारतात एकेकाळी पसरलेल्या त्रैकुटक राजघराण्याचा आहे, तर दुसरा गुजरातेत असलेल्या नवसारीच्या चालुक्यांच्या काळातला आहे.
एक ताम्रपट पूर्णपणे वाचण्यात पुरातत्वशास्त्रज्ञांना यश आलं आहे, मात्र दुसरा ताम्रपट, जो चालुक्यांशी संबंधित आहे, तो अद्याप वाचला जायचा आहे.
मात्र यामुळे घारापुरी, जे दुसऱ्या अथवा तिसऱ्या शतकापासून भरभराटीला आलेलं एक व्यापारी बंदर होतं आणि 7-8 शतकं कार्यरत होतं, हा जो पुरातत्व अभ्यासकांनी व्यक्त केलेला अंदाज होता, त्याला या ताम्रपटांमुळे बळ मिळालं आहे.
- रिपोर्ट- मयुरेश कोण्णूर
- शूट आणि व्हीडिओ एडिट- शरद बढे



