‘तो महाराष्ट्राचा घातच आहे’, शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, ‘…तो महाराष्ट्राचा घातच आहे’ शरद पवारांबद्दल प्रश्नावर ठाकरे म्हणाले
‘तो महाराष्ट्राचा घातच आहे’, शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Published

शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी (शरद पवार यांच्याशी) वैयक्तिकरित्या याबाबत बोललेलो नाही. पण मला हा मुद्दा समजू शकतो, तर त्यांनाही नक्कीच समजायला हवा. पवार साहेब असतील कोणी असतील, हे जर या बिलाच्या मुळापर्यंत जाऊन मी आत्ता मांडलेल्या बेसिक गोष्टींवर विचार करणार नसतील तर तो महाराष्ट्राचा घातच आहे."

"भाजपसह जितके महाराष्ट्राचे नेते आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांना मी सांगतोय की, तुम्हाला महाराष्ट्राचा घात करायला दिल्लीत पाठवलेलं नाही. मला पण जाता आलं नसतं का? मला पण निरोप आले नसतील का? पण मी माझ्या हितापेक्षा, पक्षाच्या हितापेक्षा जास्त महत्वाचं हित महाराष्ट्राचं मानतो आणि ते असायलाचं पाहिजे."

"त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठीच बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्याच्यामुळे मी पक्षाच्या हिताच्या वर महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघतोय. तसंच, पवार साहेबांनी सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे", असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)