'1 किलो साखर बनवायला 2,000 ते 2,500 लिटर पाणी लागतं'; जलतज्ज्ञ गुरुदास नुलकर यांची खास मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, एक किलो साखर बनवायला दोन - अडीच हजार लीटर पाणी लागतं : गुरुदास नुलकर मुलाखत
'1 किलो साखर बनवायला 2,000 ते 2,500 लिटर पाणी लागतं'; जलतज्ज्ञ गुरुदास नुलकर यांची खास मुलाखत
Published

महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर यांनी शेती आणि पाण्याच्या नियोजनावर विश्लेषण केले आहे. दुष्काळात सरकारचे उपाय हे केवळ तात्पुरती मलमपट्टी असतात. पाण्याचा पुरवठा वाढवण्याला मर्यादा असल्याने मागणीचे व्यवस्थापन करणे आणि पीक नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

'एक किलो साखर तयार करण्यासाठी दोन ते अडीच हजार लिटर पाणी लागते. साखर निर्यातीतून आपण आभासी पाण्याचा मोठा साठा बाहेर पाठवतोय, या अदृश्य नद्या दुसऱ्या देशात वाहत आहेत,' असे मत त्यांनी मांडले. याशिवाय मातीतील सूक्ष्मजीवांचे नुकसान आणि शहरांमधील पाण्याचा अपव्यय यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)