हिंगोली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांत भूकंपाचे 21 धक्के जाणवले, जमिनीखाली काय घडतंय?
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 10 वर्षांत भूकंपाचे 21 धक्के जाणवले, जमिनीखाली काय घडतंय?
Published
हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा शिंदे गावात 11 एप्रिल रोजी भीतीचं वातावरण पसरलं.
इथं 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गेल्या दशकात या भागात नोंदवला गेलेला भूकंपाचा हा सर्वांत मोठा धक्का होता. 2017 पासून गावात भूकंपाचे धक्के बसत असून आता त्याची तीव्रता वाढत चालल्याचं इथले गावकरी सांगतात. त्यामुळे इथले गावकरी भयभीत आहेत.
2017 ते एप्रिल 2026 या काळात हिंगोली, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 27 भूकंपांची नोंद झाली. यापैकी 21 धक्के एकट्या हिंगोली जिल्ह्यात नोंदवले गेले. हिंगोलीत जमिनीखाली नेमकं काय घडतंय? त्याचा शोध घेणारा बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे, अमोल लंगर
एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






