बुलढाण्यात डिझेलसाठी लोकांची झुंबड
बुलढाण्यात डिझेलसाठी लोकांची झुंबड
Published
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील कामलजा माता पेट्रोल या पंपाच्या बाहेर रांगेत उभे होते. मात्र इथे डिझेलचा टँकर आल्यानंतर जशी डिझेलची विक्री सुरू झाली आणि लोकांनी हातात ड्रम आणि कॅन घेऊन धावपळ सुरू केली.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
राज्यात पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असं सरकारमधले मंत्री सांगत असले, तरी प्रत्यक्षात राज्यात ठिकठिकाणी इंधन पंपांवर डिझेलचा तुटवडा भासतोय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



