शिवराय आणि रामदासांच्या पहिल्या भेटीबाबत एप्रिल 1672 चं पत्र काय सांगतं?

व्हीडिओ कॅप्शन, शिवराय आणि रामदासांची पहिली भेट नेमकी केव्हा झाली? | डॉ. जयसिंगराव पवार
शिवराय आणि रामदासांच्या पहिल्या भेटीबाबत एप्रिल 1672 चं पत्र काय सांगतं?

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण आता थकलो आहोत, हे राज्य आता तुम्ही सांभाळा, अशी विनंती समर्थ रामदासांना केली होती, असं विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे.

शुक्रवारी (24 एप्रिल) नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते.

या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी जानेवारी 2025 मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली होती का, यासंदर्भात विश्लेषण केलं होतं.

त्या मुलाखतीमधील हा संपादित अंश आहे. यामध्ये शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट नेमकी केव्हा झाली होती याबद्दल डॉ पवार माहिती देत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन