चेंबूरमध्ये प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झाड कोसळून मुलाचा मृत्यू?
चेंबूरमध्ये प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झाड कोसळून मुलाचा मृत्यू?
Published
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या झाडाबाबत उद्यान विभागाने यापूर्वी रस्ते विभागाला पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती, हा इशारा गांभीर्याने घेतला गेला का? यावर काय कारवाई झाली? सर्वत्र असे प्रश्न विचारले गेले.
यानंतर आता मुंबई महापालिकेने एक समिती स्थापन करून 8 दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कुटुंबावर झालेला आघात मात्र याने भरून येणारा नाही.
रिपोर्ट - अल्पेश करकरे
शूट - शार्दुल कदम
एडिटिंग - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






