लखनौच्या आगीतून मांजरी वाचल्या, पण अजूनही दहशतीत

व्हीडिओ कॅप्शन, लखनौच्या आगीतून मांजरी वाचल्या, पण अजूनही दहशतीत
लखनौच्या आगीतून मांजरी वाचल्या, पण अजूनही दहशतीत
Published

लखनौमधल्या ज्या इमारतीला आग लागून 15 जणांचा मृत्यू झाला, त्याच इमारतीत खालच्या मजल्यावर एक पाळीव प्राणी केंद्र होतं. आग इतकी भयंकर होती, की त्यात हे केंद्रही जळून राख झालं, सुदैवाने बहुतेक प्राण्यांना वाचवण्यात यश आलं.

इथून वाचवण्यात आलेल्या दोन मांजरींना या दुर्घटनेचा जबर धक्का बसला आहे. त्यांच्यावर सध्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)