महाराष्ट्रातील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकलं, तिघांचा मृत्यू
महाराष्ट्रातील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकलं, तिघांचा मृत्यू
Published
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ एका कुटुंबाची कार अडवून चार जणांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना कालव्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.
यामध्ये आई-वडील आणि मुलगी अशा तिघांचा मृत्यू झालाय. एका मुलाने पोहत बाहेर येत आपला जीव वाचवला. तर अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. हे कुटुंब मूळचं महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असल्याचं समोर आले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



