You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'NEET ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही'; नागपूरच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
स्नेहानं नागपुरातील तिच्या राहत्या घरात 20 मे 2026 रोजी आत्महत्या केली. 3 मे 2026 रोजी झालेली 'नीट'ची परीक्षा स्नेहानं दिली होती. ही परीक्षा पेपरलीक प्रकरणामुळे रद्द झाली.
"सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. सरकारनं लक्ष दिलं असतं, तर 'नीट'चा पेपर फुटला नसता आणि माझी मुलगी वाचली असती", हे शब्द आहेत स्नेहा चतुर्वेदी या 18 वर्षीय तरुणीचे वडील कृष्णकुमार चतुर्वेदी यांचे. ते बीबीसी मराठीशी बोलत होते.
स्नेहानं नागपुरातील तिच्या राहत्या घरात 20 मे 2026 रोजी आत्महत्या केली. 3 मे 2026 रोजी झालेली 'नीट'ची परीक्षा स्नेहानं दिली होती. ही परीक्षा पेपरलीक प्रकरणामुळे रद्द झाली.
स्नेहानं आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीत पेपरफुटीचा ताणाचा उल्लेख केलाय. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्नेहा चतुर्वेदीच्या आत्महत्येबाबत 'एक्स'वर पोस्ट केली आहे.
महत्त्वाची सूचना :
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
• हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
• सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
• इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
• नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
• विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)