इंडिगोच्या विमानात आग, चेन्नईला जाणारं विमान हैदराबादला लँड

व्हीडिओ कॅप्शन, इंडिगोच्या विमानात आग, चेन्नईला जाणारं विमान हैदराबादला लँड
इंडिगोच्या विमानात आग, चेन्नईला जाणारं विमान हैदराबादला लँड
Published

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात सीटवरच्या सामान ठेवण्याच्या जागेतून धूर येताना दिसला.

ओव्हरहेड बिनमध्ये ठेवलेल्या एका प्रवाशाच्या सामानातल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाला आग लागली होती. यानंतर विमान सुरक्षितपणे हैदराबादला उतरवण्यात आलं.

दरम्यान केबिन क्रूने तातडीने पावलं उचलत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं इंडिगोने म्हटलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)