दिल्लीची हवा नक्की किती खराब आहे?

दरवर्षी हिवाळा सुरू होताच, संपूर्ण दिल्लीभोवती धूर आणि धुके यांचा एक जाड थर तयार होतो. त्यावेळी इथली हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचते.

गेल्या वर्षी, स्वित्झर्लंडच्या एअर क्वालिटी मॉनिटरिंग ग्रूप 'आयक्यूएअर'ने दिल्लीला जगातील सर्वांत प्रदूषित राजधानी ठरवलं होतं. शहरातील 'कॉन्सन्ट्रेशन ऑफ पार्टिक्यूलेट मॅटर'चे (पीएम 2.5) वार्षिक सरासरी प्रमाण 108.3 µg/m³ नोंदवलं गेलं. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांच्या 5 µg/m³ पेक्षा 21 पट जास्त होतं.

एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) हा आसपासच्या हवेतील प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कणांचा स्तर किती आहे, याचं मोजमाप करतो. हा निर्देशांक 0 ते 500 च्या दरम्यान असतो. मात्र, जर प्रदूषण प्रचंड प्रमाणात असेल तर हा स्तर 500 च्याही वर जाऊ शकतो.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या (इपीआयसी) ऑगस्ट 2025 च्या एका रिपोर्टनुसार, दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेल्या या प्रदूषण करणाऱ्या कणांमुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य जवळपास 8.2 वर्षांपर्यंत कमी होऊ शकतं.

प्रदूषणाची ही समस्या फक्त दिल्लीपुरती मर्यादीत नाही. 'इपीआयसी'नुसार, दक्षिण आशिया हा जगातील सर्वाधिक प्रदूषित असा भाग आहे. दक्षिण आशियातील इतर प्रदेशही वायू प्रदूषणाने त्रस्त आहेत. 'आयक्यूएअर'च्या आकडेवारीनुसार, बांगलादेश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत प्रदूषित देश आहे. ढाकामध्ये 'पीएम 2.5'चा स्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सपेक्षा 15 पट अधिक आढळून आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हा स्तर जवळपास 20 पट अधिक नोंदवला गेला आहे.

दिल्ली दररोज श्वास घेते ती हवा

बीबीसीने गेल्या 11 वर्षांतील दररोजच्या सरासरी पीएम 2.5 पातळीचं विश्लेषण केलं. या विश्लेषणातून असं दिसून आलं आहे की, हिवाळ्यात हवेची गुणवत्ता सर्वात वाईट असते.मात्र, उर्वरित दिवसांमध्येही परिस्थिती फारशी चांगली नसते. दिल्लीतील रहिवासी जवळजवळ वर्षभर प्रदूषित आणि हानिकारक हवेत श्वास घेतात.

वर्षवर्षाचा दिवस20152016201720182019202550010015020025030035020242023202220212020

येथील प्रत्येक ओळ दिल्लीतील एका दिवसातील 'एक्यूआय'ची श्रेणी दाखवते. चांगल्या हवेची गुणवत्ता 0 ते 50 पर्यंत असते. ती इथे हिरव्या रंगात दाखवण्यात आली आहे, तर 150 पेक्षा जास्त स्तराला हानीकारक मानलं जातं. हा स्तर लाल रंगाच्या विविध छटांमध्ये दाखवण्यात आला आहे.

गेल्या दशकभरात दिल्लीमध्ये अगदी मोजक्याच दिवशी हवेचा दर्जा चांगला होता. म्हणजे AQI ची पातळी 50 पेक्षा कमी होती.

याउलट, वर्षातील सुमारे 200 दिवस किंवा जवळजवळ 60 टक्के दिवस, दिल्लीतील रहिवाशांना हानीकारक किंवा अत्यंत हानीकारक अशा गुणवत्तेच्या हवेचा सामना करावा लागला आहे. गेल्या दशकात, AQI ने 70 पेक्षा जास्त दिवसांमध्ये 500 चा आकडा ओलांडला आहे. हा आकडा अधिकृत निर्देशांकाच्या कमाल मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे.

बारीक समुद्री वाळू

90 μm (मायक्रोमीटर)

मानवी केस

70μm

मीठाचा कण

60 μm

लाल रक्तपेशी

7-8μm

पीएम 10

<10 μm

पीएम 2.5

<2.5 μm

2021202220232024010050150200250300
2021202220232024010050150200250300
2024202320222021010050150200250300
2021202220232024010050150200250300
2021202220232024010050150200250300
2021202220232024010050150200250300

दिल्लीप्रमाणेच, ढाका आणि लाहोरमधील रहिवासीदेखील वर्षातील 200 पेक्षा जास्त दिवस अस्वच्छ हवेत श्वास घेतात.

दिल्ली, ढाका, लाहोर, कोलंबो आणि काठमांडू या दक्षिण आशियाई शहरांची (ज्यांना 2014 मध्ये 'माणसांसाठी राहण्यायोग्य नसलेले' म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं) बीजिंगशी तुलना केल्यास स्पष्ट फरक दिसून येतो.

बीजिंग आणि कोलंबो या दोन्ही शहरांमध्ये वर्षातून 200 पेक्षा जास्त दिवस चांगला किंवा मध्यम एक्यूआय असतो.

पीएम 2.5 म्हणजे काय?

पार्टिक्यूलेट मॅटर हे हवेत आढळणाऱ्या घन कणांचं आणि द्रव थेंबांचं मिश्रण असतं, जसं की हवेत आढळणारी काजळी, धूर आणि धूळींचं मिश्रण.

पीएम 2.5 किंवा पार्टिक्यूलेट मॅटरचा आकार सुमारे 2.5 मायक्रोमीटर रुंद असतो. हे कण मानवी केसांपेक्षा सुमारे 28 पट पातळ असतात.
ते इतर पदार्थांच्या आकाराच्या तुलनेत किती पातळ असतात, याची तुलना येथे आहे.

दिल्लीच्या प्रदूषणासाठी सर्वांत जास्त काय कारणीभूत आहे?

प्रदूषणाचे स्रोत आणि त्यामध्ये विविध घटकांचे योगदान समजून घेण्यासाठी अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. वाहतूक, उद्योग, वीज प्रकल्प, रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम हे दिल्लीच्या प्रदूषणात सर्वाधिक योगदान देणारे पाच प्रमुख घटक आहेत.

2023 मध्ये सस्टेनेबिलिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असं म्हटलं आहे की, दिल्ली शहरावर सर्वात जास्त अभ्यास झालेले असूनही, यापैकी कोणता घटक प्रदूषणात किती भर घालतो, यावर अजूनही पुरेसं एकमत झालेलं नाही.

दिल्लीमधील थिंक टँक असलेल्या कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) ने 2019 मध्ये केलेल्या अभ्यासात 2010 ते 2018 दरम्यान केलेल्या पाच अभ्यासांचा आढावा घेण्यात आला आणि त्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या प्रदूषणाच्या योगदानाची श्रेणी सादर करण्यात आली.

कारचा धूर

अभ्यासात असं आढळून आलं आहे की, पीएम 2.5 चा सर्वात मोठा स्रोत 'वाहतूक' हाच होता. प्रदूषणामध्ये वाहतुकीचा वाटा 17.9 ते 39.2 टक्क्यांपर्यंत होता.

कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धूर

औद्योगिक क्षेत्र देखील प्रदूषणामागचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि दिल्लीच्या प्रदूषणात त्याचा वाटा 2.3 टक्के ते 28 टक्क्यांदरम्यान आहे.

कन्स्ट्रक्शन साईट

CEEW'नुसार, पीएम 2.5 प्रदूषणामध्ये दिल्लीच्या बांधकाम क्षेत्राचा वाटा 2.2 टक्के ते 8.4 टक्के दरम्यान आहे.

पेंढा जाळणं

सस्टेनेबिलिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, पेंढा जाळणं हे प्रदूषणाचं सर्वात जास्त चर्चेत असलेलं कारण असलं तरीही दिल्लीच्या प्रदूषणात पेंढा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाचा वाटा तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मानवी शरीर

हे लहान कण फुफ्फुसांचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह आणि न्यूमोनिया यांसारख्या अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

फुफ्फुस

न्यू यॉर्कच्या आरोग्य विभागाच्या मते, पीएम 2.5 कण इतके बारीक असतात की ते फुफ्फुसांच्या आत खोलवर पोहोचू शकतात. त्यामुळे अल्व्होलर भिंतींचं नुकसान होतं आणि फुफ्फुसांची क्षमता कमी होते.

हृदय

एकदा का पीएम 2.5 कण रक्तप्रवाहामध्ये शिरले की, ते रक्तदाब वाढवू शकतात किंवा रक्ताच्या गुठळ्या तयार करू शकतात. त्यामुळे हृदय आणि मेंदूला होणारा रक्तपुरवठा रोखला जाऊ शकतो आणि कालांतराने हे स्ट्रोकचं कारण ठरू शकतं.

मेंदू

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, पीएम 2.5 च्या संपर्कात आल्याने मेंदूची वृद्ध होण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते तसेच मेंदूतील पांढऱ्या तंतूंचं (व्हाईट मॅटर) नुकसान होऊ शकतं.

आरोग्यावरील परिणाम

स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024' च्या अहवालानुसार, पीएम 2.5 आणि घरगुती स्रोतांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे जगभरात 78 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.