आमदार संजय गायकवाड यांची कँटिनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

व्हीडिओ कॅप्शन, आमदार संजय गायकवाड यांची कँटिनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?
आमदार संजय गायकवाड यांची कँटिनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारत असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

शिळं आणि खराब अन्न दिल्याचं कारण सांगत गायकवाडांनी मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातल्या कँटिनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली.

बीबीसी मराठीनं या कँटिनच्या मॅनेजरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ती येथे अपडेट करण्यात येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)