डोनाल्ड ट्रम्प आत असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, बचावासाठी पत्रकारांनी आडोसा घेतला...

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प आत असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, बचावासाठी पत्रकारांनी आडोसा घेतला...
डोनाल्ड ट्रम्प आत असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, बचावासाठी पत्रकारांनी आडोसा घेतला...
Published

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर म्हणजे व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झाला, तेव्हा एबीसीच्या पत्रकार सेलिना वँगनी असा बचावासाठी आडोसा घेतला.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेली ही इमारत अमेरिकेचं महत्त्वाचं सत्ताकेंद्र असून इथे अनेक सुरक्षारक्षक तसंच गुप्तहेर तैनात असतात.

स्थानिक वेळेनुसार 23 मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास इथे गोळीबार झाला.त्यात एका नागरिकाला दुखापत झाली आहे. सुरक्षारक्षकांनी एका संशयिताला ठार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गोळीबार झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. गोळीबाराच्या घटनेनंतर व्हाईट हाऊसमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. पण कामकाजावर कुठला परिणाम झाला नसल्याचंही जाहीर करण्यात आलंय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन