दिल्लीत इंडिया गेट ते जंतर-मंतर 'सिटिझन्स मार्च'; आंदोलनात काय घडलं?
दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनांनी इंडिया गेटपासून जंतर-मंतरपर्यंत 'सिटिझन्स मार्च' काढला.
या मार्चमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले.
या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांना ताब्यात घेतलं.
'आयसा'ने आरोप केला, "पोलिसांनी नेहा बोरा यांना एका अनधिकृत वाहनातून नेले आहे आणि तिथे एकही महिला पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित नव्हती. त्यांना कुठे नेले जात आहे, हे आम्हाला माहीत नाही. त्यांच्याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही."
यानंतर सायंकाळी केलेल्या एका पोस्टमध्ये 'आयसा'ने म्हटले, "नेहा बोरा यांची नरेला औद्योगिक क्षेत्रातील पोलीस ठाण्यातून सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याकडे त्यांचा फोन किंवा बॅग नाही. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना मदत पुरवण्यासाठी आम्ही वकिलांचे एक पथक पोलीस ठाण्यात पाठवत आहोत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)






