भूमिका : आरक्षण, जातीच्या सध्याच्या मुद्द्यांवर डॉ. आंबेडकरांच्या नजरेतून पाहणारं नाटक कसं घडलं?
गेली काही वर्षे आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे...जाती-जातींमधली तेढ वाढली आहे अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून या प्रश्नांकडे पाहणारं भूमिका हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.
एक नट डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होतो आणि आंबेडकरांची भूमिका साकारता साकारता विचारांनीही बदलत जातो... आणि त्यातूनच त्याचं आयुष्यच ढवळून निघतं...आजूबाजूचं वास्तव किंबहुना जात वास्तव जास्त ठळक व्हायला लागतं...भूमिका जगता येईल, पण घेता येईल का असा प्रश्न विचारणारं हे नाटक जो विचार मांडतंय तो महत्त्वाचा आहे.
त्यामुळे टीवाय बीएच्या अभ्यासक्रमातही या नाटकाचा समावेश करण्यात आलाय. त्याच निमित्ताने या नाटकाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांच्याशी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अमृता कदम यांनी साधलेला संवाद.
मुलाखत- अमृता कदम
शूट, एडिट- शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






