‘भूतबाधे’च्या अफवेने मेळघाटात आश्रमशाळा ओस, 608 विद्यार्थी घरी परतल्याचा ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : मेळघाटात ‘भूतबाधे’च्या अफवेने आश्रमशाळा ओस, 608 विद्यार्थी घरी का गेले?
‘भूतबाधे’च्या अफवेने मेळघाटात आश्रमशाळा ओस, 608 विद्यार्थी घरी परतल्याचा ग्राऊंड रिपोर्ट
Published

शाळेतील काही विद्यार्थिनींच्या वर्तनात अचानक बदल दिसून आला. काही जणी अचानक हसू किंवा रडू लागल्या, किंचाळू लागल्या, एकटक पाहू लागल्या, तर काहींचे हातपाय ताठ झाल्याचं सांगितलं जातं. या घटनांनंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

या प्रकाराला भूतबाधेशी जोडणाऱ्या अफवा पसरल्या. मात्र, भूतबाधा झाल्याचं कोणतंही तथ्य समोर आलेलं नाही. मानसोपचारतज्ज्ञांच्या पाहणीत काही विद्यार्थिनींमध्ये Dissociative/Conversion Symptoms सारखी लक्षणं आढळल्याचं सांगण्यात आलं आहे. मानसिक ताण, भीती आणि अफवांचा परिणाम यामागे असू शकतो.

विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही मेळघाटात पोहोचले आहेत. दरम्यान, घरी गेलेल्या अनेक विद्यार्थिनींना पुन्हा शाळेत जायचं आहे. मात्र, या घटनेमुळे त्यांचं शिक्षण थांबलं आहे.

भूताच्या अफवेमुळे 608 विद्यार्थी घरी का गेले? विद्यार्थिनींमध्ये नेमकं काय घडलं? डॉक्टर आणि प्रशासन काय सांगतं? आणि या मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?

पाहा बीबीसी मराठीचा हा रिपोर्ट.

रिपोर्ट: नितेश राऊत

शूट: शार्दुल गोळे

व्हिडिओ एडिट: अरविंद पारेकर