गैरहजर खासदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, अनिल देसाईंनी काय सांगितलं?

व्हीडिओ कॅप्शन, अनुपस्थित खासदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, अनिल देसाईंनी काय सांगितलं?
गैरहजर खासदारांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, अनिल देसाईंनी काय सांगितलं?
Published

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची दिल्लीत संसद भवनातील पक्ष कार्यलयात बैठक पार पडली.

सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात कालच (17 जून) पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी काढलं होतं. मात्र, आज प्रत्यक्षात लोकसभेतील 3 आणि राज्यसभेतील एक खासदारच उपस्थित राहिले.

उपस्थित राहिलेल्यांमध्ये संजय राऊत हे राज्यसभेतील खासदार, तर अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे हे लोकसभेतील खासदार होते.

उर्वरीत म्हणजे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय (बंडू) जाधव हे लोकसभेतील खासदार उपस्थित नव्हते.

बैठकीला अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटलंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)