व्हेनेझुएलात काही सेकंदाच्या अंतराने भूकंपाचे दोन तीव्र झटके, हजारो जणांच्या मृत्यूची शक्यता

व्हेनेझुएलात भूकंपाचे दोन झटके

फोटो स्रोत, Getty Images/BBC News

फोटो कॅप्शन, व्हेनेझुएलात भूकंपाचे दोन झटके
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 रिश्टर स्केलचा होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.

या भूकंपामुळे इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले आहेत. आपली घरे रिकामे करावीत असे आवाहन गृहमंत्र्यांनी नागरिकांनी केले आहे.

या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार अंदाजे 10,000 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

भूकंपात उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून वाचलेल्यांचा शोध घेताना बचाव पथक

फोटो स्रोत, Juan BARRETO / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, भूकंपात उद्ध्वस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखालून वाचलेल्यांचा शोध घेताना बचाव पथक

नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला.

भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले.

या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Manaure QUINTERO / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

व्हेनेझुएलाच्या इतर राज्यातही भूकंपाचे झटके जाणवले. व्हेनेझुएलाच्या गृहमंत्र्यांनी टीव्हीवर सांगितले की देशातील इतर राज्य देखील प्रभावित झाली आहेत.

व्हीटीव्ही शी फोनवरुन बोलताना त्यांनी म्हटले की सर्व संकेत हेच सांगत आहेत की या भूकंपांची तीव्रता सातहून अधिक होती.

गृहमंत्री म्हणाले, या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.

पुढे त्यांनी सांगितले की कराकासमध्ये पालोस ग्रांदेस आणि अल्तामीरा हे भाग भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

कोलंबियापर्यंत जाणवले धक्के

बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी विल ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये अनेक इमारतींना तडे गेल्याचे दिसून येत आहे. काही इमारतींचे मोठे नुकसान झाले असून काही इमारती कोसळल्याही आहेत.

भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीने हजारो रहिवासी अद्याप त्यांच्या घरांमध्ये परतलेले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला.

आफ्टरशॉकच्या (पुन्हा बसणाऱ्या धक्क्यांच्या) भीतीमुळे हजारो लोक अजूनही आपल्या घरांमध्ये परतलेले नाहीत.

भूकंपाचे धक्के कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत जाणवले.

सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नेमकं किती नुकसान झालं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)