Photos : पोलिसांची कारवाई ते अभिजीत दिपकेंचे उपोषण, पाहा जंतरमंतरवरील सकाळपासूनची परिस्थिती

जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

जंतरमंतरवर आज सकाळपासून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सोनम वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलक, स्वयंसेवक आणि समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. पोलिसांची कारवाई, आंदोलकांचा विरोध, तिथं झालेली धक्काबुक्की आणि त्यानंतरचे घडामोडी या छायाचित्रांमधून पाहा

गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.

सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली जे अंगमो यांनी त्यांच्या संमतीशिवाय तोंडावाटे किंवा शिरांमधून कोणतेही औषध अथवा द्रवपदार्थ देऊ नये, असे म्हटले आहे.

"मी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, इथे सोनम वांगचूक यांना दाखल करण्यात आले आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारे त्यांचे डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय आणि माझी संमती घेतल्याशिवाय त्यांना तोंडावाटे किंवा शिरांमधून (इंट्राव्हेनस) कोणतेही औषध किंवा द्रवपदार्थ देऊ नये."

जंतर-मंतर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अशाप्रकारे व्यापीठावरून उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं.

पोलिसांच्या या कृतीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके म्हणाले, "सकाळी 7 वाजता मी फ्रेश होण्यासाठी बाहेर पडलो असताना पोलीस गुंड येथे आले. त्यांनी सोनम सरांना शिवीगाळ करत जबरदस्तीने ओढत नेले."

"60 वर्षांची एक व्यक्ती, जी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत होती आणि ज्यांनी अन्नाचा एक घासही खाल्ला नव्हता, त्यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन नेले. त्यांना कुठे नेले आहे याची आम्हाला काहीच माहिती नाही."

वांगचूक यांना रुग्णालयात नेल्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वांगचूक यांना रुग्णालयात नेल्यानंतर काही आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला.

जंतर-मंतरवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले, "पहाटेच त्यांनी डॉक्टरांचे पथक असल्याचे सांगून 10 पोलिसांना आत पाठवले. ते डॉक्टरांसारखे दिसत नव्हते, त्यामुळे आम्हाला समजले होते की ते कदाचित पोलीसच आहेत."

जंतर-मंतर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पोलिसांनी जंतर-मंतर इथून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला.

"त्यांनी सर्व स्वयंसेवकांना ही जागा रिकामी करण्यास सांगितले. स्वयंसेवकांनी सांगितले की सकाळी पावणे नऊ वाजता सोनमजींची तपासणी होते, तेव्हा या. पण अचानक त्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगायला सुरुवात केली आणि सोनमजींना घेऊन जावे लागेल असे म्हटले."

पोलिसांनी जंतर-मंतर इथून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पोलिसांनी जंतर-मंतर इथून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला.

दिल्ली पोलिसांच्या न्यू दिल्ली विभागाचे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी एक्सवरील पोस्टमध्ये ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यासाठी केल्याचं म्हटलं आहे.

जंतर-मंतर

फोटो स्रोत, @CJP_for_India

फोटो कॅप्शन, वांगचूक यांना नेल्यानंतर जंतर मंतरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

दिल्ली पोलिसांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार, सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

वांगचूक यांना नेल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर अभिजीत दिपके यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
फोटो कॅप्शन, वांगचूक यांना नेल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर अभिजीत दिपके यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

पोलीस कारवाई करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अभिजीत दिपके यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
फोटो कॅप्शन, अभिजीत दिपके यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

मात्र, पोलिसांनी कारवाई करत जंतर-मंतर येथील आंदोलकांनी शांततेने आणि शक्य तितक्या लवकर हे ठिकाण रिकामं करावं, अशी विनंती केली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.