ग्राऊंड रिपोर्ट : नवी मुंबईतील फ्लेमिंगो वेटलँड धोक्यात? नेमका वाद काय?

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : नवी मुंबईतील फ्लेमिंगो वेटलँड धोक्यात? नेमका वाद काय?
ग्राऊंड रिपोर्ट : नवी मुंबईतील फ्लेमिंगो वेटलँड धोक्यात? नेमका वाद काय?
Published

NRI वेटलँड, DPS तलाव परिसर, T.S. चाणक्य परिसर आणि आसपासच्या मॅन्ग्रोव्ह पट्ट्यांमुळे हा भाग जैवविविधतेसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र याच परिसरातील काही जमिनींवर विकास प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव आणि पाणथळ जागांच्या संरक्षणाची मागणी यामुळे गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. पुढच्या काही वर्षांत नवी मुंबईची ओळख 'फ्लेमिंगो सिटी' म्हणून कायम राहणार? की फ्लेमिंगो फक्त शहराच्या ब्रँडिंगपुरतेच उरणार? असं नवी मुंबईकर विचारतायत.

पाहा अरविंद पारेकर आणि अल्पेश करकरे यांचा हा सविस्तर रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)